मराठा आरक्षण मुद्दा केंद्र सरकारच सोडवू शकते-आ रोहित पवार

0

अमरावती- मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारच सोडवू शकते.मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारसोबत राज्यकर्त्यांनी बोलावे असे आवाहन आ रोहित पवार यांनी केले आहे.
मी पवार कुटुंब व आडनावाचा केव्हा फायदा किंवा उपयोग घेतला नाही तीन राज्य भाजपने जिंकले पण याचा फरक लोकसभा निवडणुकीत पडणार नाही. मध्य प्रदेश राज्यात भाजपाचा चांगला विजय झाला त्याच्यामध्ये कोण हरलं असेल तर सिंधीया हारले आहेत. कारण त्यांचं राजकीय महत्व मध्य प्रदेशमधून संपलेलं आहे आणि जी परिस्थिती सिंधीया यांची त्या भागामध्ये झाली तीच परिस्थिती या भागामध्ये जे -जे नेते आणि मित्रपरिवार भाजपबरोबर गेलेत त्यांचे तेच होणार आहे. कारण
भाजपची प्रवृत्ती आणि वृत्ती हीच आहे की, पक्षाच्या जवळ असेल त्याला संपवायचं नेत्यांना संपवायचं आणि ते मध्य प्रदेशमध्ये झालंही तेच इतरही राज्यांमध्ये झालं आणि ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा होईल .काही लोकं सोयीचं राजकारण करतात. हे सोयीचं राजकारण आम्हाला पटत नाही. एकीकडे हे घराणेशाहीचं म्हणतात.. मग अजित पवार, विखे पाटील, पंकजा मुंडे, मोहिते पाटील हे कोण आहेत ? मग, भाजपाकडे तर सगळ्यात जास्त घराणेशाही आहे. सरकारचं लक्ष सामान्य लोकांच्या अडचणींकडे जावं हा आमचा प्रमाणिक प्रयत्न आहे. आधुनिक पंतांच्या विचारसरणीविरूद्ध लढा देऊ असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला.