जो गुरूंचे ऐकतो तोच गुरू बनू शकतो

0

 

धर्मभास्कर सद्गुरूदास महाराज

गुरू को सब सूनते है, गुरू की कोई सूनता नही! जो सूनता है वही गुरू बन जाता है हा संदेश आज धर्मभास्कर सद्गुरूदास महाराज ह्यांनी

प.पू.श्री विष्णुदास महाराज (Shri Vishnudas Maharaj)अध्यात्म साधना महाल केंद्राचा वार्षिकोत्सव कार्यक्रमात आपल्या उद्बोधनात दिला.
त्यांनी महाल केंद्रातील उपसकांचे , श्रीशिवराज्याभिषेक सोहळा सादरीकरण करणाऱ्यांचे कौतुक , अभिनंदन केले. त्या सर्व कलाकारांना महाराजांनी ११०००/- रुपयाचे बक्षीस दिले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळी महाल उपासना स्थानी देवपीठ स्थापने पूजेनंतर श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री सुक्त, श्री दत्त अथर्वशीर्ष, बावनश्लो देकी श्रीगुरु चरित्राची आवर्तन सामूहिक करण्यात आली. दुसऱ्या सत्रात धर्मभास्कर सद्गुरूदास महाराजांचे उपासना केंद्र स्थानी आगमन झाले. लगेचच कार्यक्रम स्थळी प.पू. महाराजांची वेद घोषात पाद्यपूजा वे. शा.स. अनिरुध्द पडेगावकर व ब्रहमवृंद ह्यांच्या पौरोहित्यात संपन्न झाली. केंद्र प्रमुख श्री बाटवे ह्यांनी प्रास्ताविक केले सामूहिक उपासनेत गुरूमंदिर येथे नित्य नियमाने होत असलेली ५ प्रदक्षिणा पद पैकी ३ री प्रदक्षिणा सामूहिकपणे ताल सुरात झाली. केंद्रातर्फे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे नाटक रुपात उत्कृष्ठ सादरीकरण करण्यात आले.

या नाटकात शालेय विद्यार्थी व केंद्र उपसिका ह्यांनी सहभाग घेतला होता. सौ. वासंती हरकरे ह्यांचे निर्देशन होते तसेच निवेदन सौ. संध्या बाटवे नी केले. ३५० व्या श्री शिवराज्याभिषेक शक वर्षानिमित्त छत्रपती सेवा प्रतिष्ठान चे सचिव श्री संजय देशकर ह्यांचे ” हर घर शिवचरित्र” ह्या विषयावर व्याख्यान झाले. १८००/- रुपये किमतीचे श्री विजयराव देशमुख लिखित शककर्ते शिवराय चे २ खंड केवळ ५०० रुपयात कसे उपलब्ध केले या मागची प्रतिष्ठान व लेखकाची भूमिका सांगितली. प्रतिष्ठान ने या वर्षात १ लक्ष घरात शककर्ते शिवराय शिवचरित्र पोहचवण्याचा संकल्प केला आहे असे नमूद केले. शिवचरित्र हे देशाचे चरित्र व्हायला पाहिजे असे आज सर्व संत सांगत आहे असे सांगितले.
ह्या संपूर्ण सोहळ्याचे संचालन सौ. वासंती हरकरें व आभार प्रदर्शन सौ. माधुरी मुळे यांनी केले.