ओबीसी समाजाचे हित भाजपानेच जाणले- संजय गाते

0

चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी जागर यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत नागपूर -या देशात काँग्रेसच्या काळात ओबीसींची उपेक्षाच झाली. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात खऱ्या अर्थाने ओबीसींचे हित जाणून त्यांच्या कल्याणाच्या विविध योजना राबविण्यात आल्या. विविध समाजाप्रमाणे ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात आले. केंद्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली आणि अध्यक्ष पदाचा मान चंद्रपूर जिल्ह्याला हंसराज अहिर यांच्या निमित्ताने मिळाला.

वनमंत्री व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून अर्थमंत्री म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात मोठा प्रमाणात विकास कामे झाली. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट झाला.नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात किमान दोन लाख लोकांना लाभ मिळावा असा आपला प्रयत्न असून ओबीसींच्या कल्याणकारी योजनांची माहिती ओबीसी समाजापर्यंत पोहोचावी यासाठी ही ओबीसी जागर यात्रा निघाली असल्याचे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केले.वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर येथे ओबीसी मोर्चाचे प्रदेशप्रभारी आमदार आशिष देशमुख यांच्या मार्गदर्शनात निघालेली ओबीसी जागर यात्रा आज चंद्रपूर येथे पोहोचली.यावेळी ते मार्गदर्शन करत होते. सह संपर्कप्रमुख रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, राजूरकर आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. मूल, भद्रावती व ठिकठिकाणी या ओबीसी जागर यात्रेचे स्वागत करण्यात आले.