

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पाऊस दडी मारून बसलेला आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत जेवढा पाऊस अपेक्षित होता त्यापेक्षा फक्त 81 टक्के पाऊस पडलेला आहे. जर मान्सून कालावधीतील चार महिन्यांचा विचार केला तर सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत जिल्ह्यात फक्त 66% पाऊस पडलेला आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये एकूण 6 व्यक्तींचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेला आहे. त्या 6 व्यक्तींना जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासनाकडून प्रत्येकी 4 लाख रुपये मदत देण्यात आलेली आहे. तसेच पशुधनाची हानी झालेली आहे त्यांना पण मदत देण्यात आली. आतापर्यंत एकूण 650 घरगुती गोठे पडलेले आहेत . त्या करिता नुकसान भरपाई राज्य शासनाकडून ही मागणी करण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी लवकरात लवकर अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करण्यात आली आहे .