
मा. श्री. नितीन गडकरी यांनी काढली पहिली ‘ऑनलाईन पास’
नागपूर, 1 नोव्हेंबर : केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांनी शनिवारी QR कोड स्कॅन करून ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव – 2025’ च्या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंदणी केली आणि पहिली ऑनलाईन पास प्राप्त करीत महोत्सवाच्या ‘ऑनलाईन मोफत पासेस’ उपक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, अविनाश घुशे, चेतन कायरकर, आशिष वांदिले, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, उपस्थिती होती.
वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेला ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव – 2025’ येत्या, 7 नोव्हेंबर पासून प्रांरभ होत आहे. हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर होणा-या या महोत्सवाचा सर्व नागरिकांना आनंद घेता यावा, यासाठी ‘ऑनलाईन पासेस’ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या विविध माध्यमांवरील जाहिराती, होर्डिंग्ज यावर QR कोड छापण्यात आले असून हा QR हा स्कॅन केल्यानंतर www.khasdarmahotsav.com हे संकेतस्थळ सुरू होईल. या संकेतस्थळावरून प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाच्या पासेस चार दिवस आधीपासून वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.



















