ऑनलाईन गेमिंगच्या नादात नागपुरात मुलीची आत्महत्या

0

नागपूर (NAGPUR) : ऑनलाईन गेमिंगच्या हव्यासात मृत्यूनंतर काय होते हे जाणून घेण्याच्या उत्सूकतेपोटी नागपूर येथील एका १७ वर्षीय तरुणीने हाताची नस कापून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

नरेंद्र नगर पुलाजवळील प्रियंका वाडी येथील पॉश कॉलनीत राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीला ऑनलाईन गेमिंगचा नाद होता. दरम्यान, तिला मृत्यूनंतर कोय होते हे बघण्याचा हौस वाटली. यात तिने आपल्या हाताची नस कापून घेतली. यात तिचा मृत्यू झाला. यापूर्वी तिने एक चिट्टी सुद्धा लिहून ठेवल्याचे बोलले जाते. मात्र या घटनेचे पोिलसांनी फारच गोपनियता बाळगली आहे. मुलीचे वडिल एका मोठ्या वित्त संस्थेत नोकरी होते असे समजते.

अलिकडे विकासाबरोबर कल्चरही बदलत चालले आहे.यात दररोज.कुठेना कुठे वेगवेगळ्या घटना घडतात. कधी प्रेमभंग, कधी प्रियकरच बाहेर नेऊन गेम करतो तर कधी ऑनर् किलिंग सारख्याही घटना घडतात. शिवाय मुलींच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे.हा चिंतेचा विषय ठरला आहे.