

नाशिक NASHIK : कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने गुरुवारी कांदा निर्यातबंदी निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली असून नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे कांदा Onion उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेत तीन ठराव मंजूर करण्यात आले. तातडीने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याची विनंती या बैठकीत करण्यात आली असून तीन ठराव पुढीलप्रमाणे 01 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन दिल्ली गाढणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची भेट घेत कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची विंनती करणार, 2 बाजार समितीमध्ये विक्री होणाऱ्या कांद्याला 3 हजार रुपयांपेक्षा कमी दर मिळाल्यास कांदा लिलाव रद्द करणार तसेच 3 हजारांपेक्षा कमी दर मिळणाऱ्या बाजार समिती कांदा विकी करणार नाही. 3 केंद्र सरकार कांदा आयात -निर्यात धोरणात हस्ताक्षेप करत असल्याने या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करणार असे तीन ठराव करण्यात आल्याची माहिती भारत दिघोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना )यांनी दिली.