
एका विद्यार्थिनीचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
नागपूर (Nagpur), २६ नोव्हेंबर: नागपूरच्या शंकर नगर येथील सरस्वती हायस्कूलचे विद्यार्थी वर्धा जिल्ह्यातील हरक्यूलिस पिकनिक स्पॉटकडे जात असताना हिंगणी रोडवरील देवळी पेंढरी गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला. विद्यार्थ्यांच्या पाच बसच्या ताफ्यातील शेवटची बस घाटातील एका वळणावर नियंत्रण सुटून उलटली.
या बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी होते, ज्यात विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश होता. अपघातात अर्ध्याहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. एका मुलीला आणि एका शिक्षकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. किरकोळ जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य तातडीने सुरू केले. अपघाताचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही, मात्र वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये भीती पसरली असून शाळा प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील बोरधरणकडे जात असलेल्या सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसचा आज अपघात झाला. पेंढरी गावाजवळ बस अपघातात उलटली आणि या दुर्घटनेत एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. सकाळी ५ बसांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू होता, त्यात ४ बस पुढे निघाल्या, तर शेवटच्या बसचा चालकाचं नियंत्रण सुटून बस उलटली. ज्यामुळे बसमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्वरित मदत केली आणि जखमी विद्यार्थ्यांना नागपूरमधील मिहान येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, अधिक तपास केला जात आहे.
या घटनेनं शालेय बसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शाळांना आणि स्थानिक प्रशासनाला शालेय वाहतूक सुरक्षा अधिक चोख करणे आवश्यक आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुढे योग्य उपाययोजना घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
















