

आरक्षणविरोधी विधानाचे समर्थन करताना लाज वाटली पाहिजे: भाजपा सचिव प्रतीक कर्पे यांचा नाना पटोलेंवर निशाणा
मुंबई (Mumbai), : अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींच्या आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या विधानाचे समर्थन केल्याबद्दल काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर भाजपाचे मुंबई सचिव प्रतीक कर्पे यांनी जोरदार टीका केली आहे. “आरक्षणविरोधी विधानाचे समर्थन करताना लाज वाटली पाहिजे,” असे म्हणत कर्पे यांनी पटोलेंना लक्ष्य केले आहे.
भाजपा सचिव कर्पे यांनी ट्विटमध्ये म्हटले, “महाराष्ट्रात औरंगजेबी फॅन क्लब सत्तेत आल्यावर मागासवर्गीयांच्या हक्कांवर गदा येईल, हेही ध्यानात ठेवा!” त्यांनी काँग्रेस पक्षावरही हल्लाबोल केला. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना प्रियांका गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरताना दरवाजाबाहेर ठेवले होते, असे उदाहरण देत कर्पे यांनी काँग्रेसवर ओबीसी नेत्यांविषयीच्या अपमानाचा आरोप केला.
“सावध ऐका पुढल्या हाका… काळ सोकावला आहे,” असे म्हणत कर्पे यांनी मतदारांना सावध राहण्याचा इशारा दिला.