Saptsringi Ghat  सप्तश्रृंगी घाटात एसटी बस दरीत कोसळून अपघात, एक ठार, २० जखमी

0

नाशिक Nashik , १२ जुलै : सप्तश्रृंगी गडाच्या  Saptsringi Fort घाटात एसटी बस ४०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य It is reported that 18 to 20 passengers were injured १८ ते २० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे, तर काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा हा अपघात घडला.One killed, 20 injured as ST bus falls into ravine at Saptsringi Ghat 

मिळालेल्या माहितीनुसार, सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरून MH 40 AQ 6259 क्रमांकाची बस दरीत कोसळल्याची माहिती आहे. According to the information received, the bus of the devotees who were returning after having darshan of Saptashringi Devi met with an accident. It is reported that bus number MH 40 AQ 6259 fell into the valley from Ganapati stage at Saptsringi fort ghat. खामगाव डेपोची ही एसटी बस होती. आज (बुधवारी) सकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरून बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. यावेळी बसमध्ये २२ जण प्रवास करत होते. १६ प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी या गावचे असून गडावरील ४ प्रवासी आहेत. इतर दोघांमध्ये बस चालक गजानन टपके, वाहक पुरुषोत्तम टिकार कर्तव्यावर होते. अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याचे खामगाव आगार सहाय्यक कर्मचारी शुभांगी पवार यांनी सांगितले.

बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरून परतीच्या प्रवासाला निघाली असता हा अपघात झाला. दरम्यान बचाव पथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून जखमी प्रवाशांना वणी उप रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मालेगावहून अपघातस्थळी जात परिस्थितीची आणि मदतकार्याची माहिती घेतली.

 

दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सप्तश्रृंगी घाटात एसटी बसचा अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वतोपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील १८ प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉइंटजवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना.