
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
(nagpur)नागपूर – नागपुरच्या पारडी पोलीस स्टेशन हद्दीत घटाटे नगर परिसरात एका केक दुकानदाराने एका भाजी विक्रेत्यांची हत्या केली. घटाटे नगर परिसरात गजानन वाडणकर यांचे केक कलर्स नावाचे दुकान आहे. त्याच्या दुकानासमोर प्रभुदयाळ सराटे भाजीचा ठेला लावत होता. काल रात्रीच्या सुमारास मृतक प्रभूदयाल सराटे यांनी आरोपी गजानन वाडनकर याच्या केकच्या दुकानासमोर ठेला लावला. हा ठेला लावण्यावरूनच दोघांमध्ये वाद झाला.
मात्र,वाद एवढा विकोपाला पोहचला की, आरोपी गजानन वाडनकर याने प्रभुदयालच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. प्रभुदयाल सराटे असे मृताचे नाव असून गजानन वाडणकर आरोपीचे नाव आहे. घटनास्थळी असलेल्या लोकांनी या प्रकाराची माहिती पारडी पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व आरोपी गजाननला ताब्यात घेतले. पुढील तपास करीत आहे.