
(SHIRDI)शिर्डी – आज आषाढी एकादशीनिमित्त शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई प्रसादालयात खास साबुदाणाच्या महाखिचडीचा प्रसाद देण्यात आला. साईप्रसादालयात तब्बल 7 हजार किलो साबुदाणा 5 हजार किलो शेंगदाणे 1 हजार किलो तूप वापरून साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली आहे. आज दिवसभरात जवळपास 80 हजार भाविक साईप्रसादाला येतील, अशी शक्यता गृहीत धरून साई प्रसादालयात हा प्रसाद तयार करण्यात आला आहे. साईबाबांच्या समाधीवरसुद्धा याच खिचडीचा प्रसाद दाखवण्यात आला.