

नागपूर (Nagpur):- स्वरश्री भजन मंडळ अभंग स्पर्धेचे महाविजेते आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती मध्य नागपूर द्वारे आमदार प्रवीणजी दटके यांच्या संकल्पनेतून मध्य नागपूरातील उत्साही भजनी मंडळांसाठी आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) शुभपर्वावर सामूहिक अभंग गायन स्पर्धेचे आयोजन उत्सहात संपन्न होऊन संपूर्ण परिसर विठ्ठल भक्तीने उजळून निघाला. या महाअंतिम फेरीत स्वरश्री भजन मंडळ, गणेशपेठ हे २१०००/- रोख पुरस्कार व सन्मानचिन्ह घेऊन प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत.
स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार प्रा. अनिलजी सोले,(Anil Sole) भागवतभूषण सौ मोहिनी देवपुजारी यांचे हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत जवळपास मध्य नागपुरातील १३७ भजनी मंडळांनी सहभाग घेतला असून त्यामधील २१ उत्तम विजेत्यां भजनी मंडळांची महाअंतिम फेरी शनिवारी संपन्न झाली. स्पर्धेचे बक्षीस वितरण ह. भ. प श्रीरामपंत जोशी महाराज, भाजपा (BJP) नागपूर महानगरचे अध्यक्ष श्री दयाशंकर तिवारी (Daya Shankar Tiwari), कबीर मठाचे श्री महंत मुनिंद्रनाथ महाराज, महाराष्ट्र प्रदेश (Maharashtra) ओबीसी महामंत्री सौ अर्चनाताई डेहनकर तसेच मंडळ अध्यक्ष श्याम चांदेकर आदी मान्यवर अतिथींच्या उपस्थित संपन्न झाले.
भजनातून ईश्वर प्राप्तीचा आनंद घेऊन हिंदू संस्कृतीचा जागर करावा असे गौरवोद्गार ह भ प श्रीरामपंत जोशी यांनी काढले.विजेत्या मंडळांना अनुक्रमे प्रथम क्रमांक २१०००/- स्वरश्री भजन मंडळ, द्वितीय – स्वरा भजन मंडळ महाल, तृतीय क्रमांक गुरु माऊली भजन मंडळ, चतुर्थ क्रमांक- रामकृष्ण हरी भजन, पाचवा- समर्थ भजन, सहावा श्रीराम मंदिर टिळक पुतळा, सातवा क्रमांक सखी भजन मंडळ आणि १६ भजनी मंडळांना उत्तेजनार्थ मानधन व सन्मानचिन्ह देण्यात आले आहे.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
स्पर्धेचे परीक्षण विजय बोरीकर यांनी केले. या स्पर्धेची संकल्पना आमदार प्रवीण दटके (Praveen Datke) यांची असून संयोजन डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले. स्पर्धेचे यशस्वितेसाठी आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती तर्फे रेखा निमजे, कविता इंगळे, श्वेता निकम भोसले, सारिका नांदूरकर , अनिता काशीकर, श्रद्घा पाठक, अभिजीत कठाले,संगीत नाईक, दिपाली नंदनवार,कल्पना मानापुरे सविता उमाठे आणि समस्त पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.
Ashadhi Ekadashi Quotes in Marathi
Ashadhi Ekadashi wikipedia
Ashadhi ekadashi 2025 wishes
Ashadi ekadashi 2025 marathi wishes
Ashadhi Ekadashi information in english
Ashadhi Ekadashi essay in english 10 lines
Ashadhi ekadashi information in marathi
Ashadhi ekadashi status