
(Wardha)वर्धा – आज शाळेचा पहिला दिवस, आजच्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये घरच्यासारखे वातावरण मिळावे, तसेच त्यांना आपल्या संस्कृतीची जाणीव व्हावी यासाठी वर्ध्यातील सरस्वती विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना खाऊ सुद्धा वाटप करण्यात आला. विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेत येताना आनंद वाटावा या हेतूने स्वागताचे आयोजन करण्यात आले होते. विद्येची देवी सरस्वती यांच्या फोटोचे पूजन केल्यानंतर विद्यार्थी आपल्या वर्गखोलीमध्ये गेले. त्यांना शिक्षकांनी खाऊ वाटप करत, गणपती स्तोत्र आणि राम रक्षा स्तोत्र पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय गणवेश व पुस्तके वाटप
(Buldhana)बुलढाणा – महाराष्ट्रातील इतर भागात शाळा काही दिवसांपूर्वीच शाळा सुरू झाल्या असल्या तरीही आजपासून विदर्भातील शाळा सुरू झाल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातही आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्याने मुलाचा किलबिलाट शाळेत ऐकू येत आहे. दोन महिन्यांपासून घरी बसलेले हे चिमुकले आजपासून शाळेचा आनंद घेत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पहिल्याच दिवशी गणवेश व पुस्तके वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.