
रोजगार पुरक शिक्षण विषयक माहिती स्थानिक विद्यार्थ्यांना देण्यास ओमॅट वेस्ट लिमिटेड चा सदैव पुढाकार राहील – रवि चावरे, महाप्रबंधक ओमॅट वेस्ट लिमिटेड
सौ. लीना किशोर मामीडवार इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट स्टडिज अँड रिसर्च च्या बीबीए व एमबीए च्या विद्यार्थ्यांची ओमॅट वेस्ट लिमिटेड ला औद्योगिक भेट
चंद्रपूर :- स्थानिक उद्योगात होत असलेले उत्पादन, उद्योगाची संपूर्ण माहिती व त्यासंबंधी कोणत्या पद्धतीचे शिक्षण व कौशल्य अवगत करावे यासंबंधीची परिपूर्ण माहिती देण्यास ओमॅट वेस्ट लिमिटेड सदैव सकारात्मकतेने पुढाकार घेऊन कार्य करेल असा विश्वास महाप्रबंधक रवी चावरे यांनी व्यक्त केला. सौ. लीना किशोर मामीडवार इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट स्टडिज अँड रिसर्च च्या बीबीए व एमबीए च्या विद्यार्थ्यांकरिता उद्योगात आयोजित औद्योगिक भेट प्रसंगी ते बोलत होते.
सदर महाविद्यालयातून अनेक होतकरू विद्यार्थी घडले असून विविध क्षेत्रात आपले कौशल्य सिद्ध करीत आहेत. आज या औद्योगिक भेट कार्यक्रमाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना उद्योगात होत असेलेले उत्पादन, उत्पादन प्रक्रिया, व्यवस्थापन अशा अनेक पैलूंना समजण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. उद्योगात कोणते रोजगार पूरक शिक्षण व कौशल्यांना वाव आहे याची सविस्तर माहिती विद्यार्थी चमूला दिली असतांना हि औद्योगिक भेट त्यांच्या विद्यार्थी जीवनाला नवीन देश देत भविष्यात उद्योगात रोजगाराभिमुख ओळख निर्माण करण्यात मैलाचा दगड ठरेल असा विश्वासही यावेळी रवी चावरे यांनी व्यक्त केला.
स्थानिक विद्यार्थ्यांच्या चमूची औद्योगिक भेट हि संकल्पना मुळात समाधान देणारी आहे. येणाऱ्या भविष्याला उद्योगाचे तांत्रिक व व्यवथापनाची प्रत्यक्ष माहिती माहिती पुरविणे हि आम्हाला पिढी घडविण्यात एक सहकार्याची भूमिका म्हणून आज आम्ही बघतो आहे. शैक्षणिक संस्थेत व्यवस्थापनेचे धडे आत्मसात करीत असतांना उद्योगाच्या विविध आयामांना अनुभवणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वासाची अनुभूत पर्वणी ठरावी असा उत्साह आज विद्यार्थ्यांमध्ये बघून आज अतिशय आनंद झाल्याचे यावेळी युनिट हेड अविनाश डोंगरे यांनी सांगितले. अविनाश डोंगरे यांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांची भेट यावेळी त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी एकूण १०० विद्यार्थ्यांनी ओमॅट वेस्ट लिमिटेड येथे आयोजित औद्योगिक भेट या उपक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदविला. औद्योगिक भेट यशस्वी करण्यात उद्योगाचे सर्वश्री महाप्रबंधक मनीष वडस्कर, सतीश मूलकलवार, अमरेंद्र सिंह ठाकूर, ओम नरेश भदोरिया, मानव संसाधन विभाग प्रमुख अभय सिंह, प्रशासन विभाग दीपक पराळे, सुरक्षा विभाग प्रमुख सुखेंद्र कुमार, जयंत गाडेकर, दिनेश वंजारी, डि राजकुमार एस एन के रेड्डी, स्वप्नील देशमुख, शुभम तांबोली आकाश सोयाम यांनी विशेष योगदान दिले.
सौ. लीना किशोर मामीडवार इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट स्टुडिस अँड रिसर्च चे प्रमुख डॉ. जयेश चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी डॉ. नियाज शेख, डॉ. बिपीन भोगेकर, डॉ. सारिका नांदे डॉ रमा सिंह यांनी हि औद्योगिक भेट यशस्वी केली.