Maharashtra Police : पोलीस हेड काॅन्स्टेबलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; गृहविभागाचा मोठा निर्णय

0

Maharashtra Police : राज्याच्या पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, गृहविभागाने पोलीस हेड काॅन्स्टेबललाही (Police Head Constable) गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिले आहेत.

Maharashtra Police : राज्याच्या पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, गृहविभागाने पोलीस हेड काॅन्स्टेबललाही (Police Head Constable) गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिले आहे. महाराष्ट्र शासनाचे गृह विभागाकडून सदर राजपत्राद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी पोलीस हेड काॅन्स्टेबलला काही नियम आणि अटींची पूर्तता करणं बंधनकारक असणार आहे. पोलीस हेड काॅन्स्टेबल हा पदवीधर असावा. सोबतच 7 वर्ष सेवा पूर्ण केलेला आणि गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक येथील 6 आठवड्याचे विशेष प्रशिक्षण पूर्ण व परीक्षा उत्तीर्ण असलेला असणे गरजेचे राहणार आहे.

अधिकार्‍यांवर ताण वाढला

पुढे आलेल्या माहितीनुसार, शहरी भागात अपुरे मनुष्यबळ जरी असले तरी अधिकार्‍यांची संख्या ही व्यवस्थित आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक पदापासून वरील पदाधिकार्‍यांकडे दिला जातो. मात्र ग्रामीण भागात अपुऱ्या मनुष्यबळाबरोबरच अधिकार्‍यांची संख्या ही कमी आहे. अशात एकाच अधिकार्‍याकडे अनेक गुन्ह्यांचा तपास दिल्याने अधिकार्‍यांवरील ताणही वाढत असून गुन्हे उकलीचे प्रमाणही कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच आता पोलीस दलात उच्च शिक्षित तरुणही भरती झाल्याने त्यांचा अनुभवाची दखल घेऊन, त्यांच्याकडे छोट्या गुन्ह्यांचा तपास देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. ज्यामुळे अधिकार्‍यांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल आणि गुन्हे उकलीचा आलेखही वाढेल. त्या अनुषंगाने गृहविभागाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यातील आठ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील एकूण आठ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश (Maharashtra IPS Transfer List) जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी रविंद्र शिसवे (IPS Ravindra Shisve) यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. तर शारदा निकम (IPS Sharda Nikam) यांची बदली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे.

रविंद्र शिसवे – सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग
शारदा वसंत निकम -विशेष पोलिस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
निसार तांबोळी – विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दर
एन डी रेड्डी – पोलिस सहआयुक्त, नागपूर
सुप्रिया पाटील-यादव – विशेष पोलिस महानिरीक्षक, आस्थापना
राजीव जैन – विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा
अभिषेक त्रिमुखे – विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशासन