उद्धव ठाकरेंचा जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा

0

नागपूर NAGPUR -आपण मुख्यमंत्री असतो तर सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करावेच लागले नसते, असा दावा माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray  यांनी केलाय. तर सरकारला आता पेन्शन नव्हे टेन्शन देण्याची गरज आहे, असा हल्लबोलही त्यांनी केला. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी जर सध्या मी मुख्यमंत्री असतो तर तुमच्यावर ही आंदोलन करण्यची वेळच आली नसती असे ठाकरे म्हणाले.
माझा पक्ष, निवडणूक चिन्ह चोरले आहे. मी मुख्यमंत्री असतो तर निर्णय घेऊ शकलो असतो. पण आज मी काही नसताना तुम्हाला ताकद आणि विश्वास द्यायला आलो आहे. मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या लढ्यात शिवसेना प्रत्येक पावलावर सहभागी होईल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.