बापरे! एवढ्या रुपयांची केली फसवणूक

0

नागपूर (Nagpur) – मध्य प्रदेशातील एका महाठगाने नागपूरातील एका ऑइल कंपनीच्या संचालकाची फसवणूक केली आहे. आरोपीने कंपनीच्या संचालकाला मोठ्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची बतावणी करून त्याच्याकडून ऑइल पुरवठा मागितला. मात्र, त्याने त्या ऑइलची परस्पर विक्री करून 1 कोटी 96 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

फिर्यादी स्पर्श गावंडे यांचा पेट्रोलियम प्रॉडक्ट ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. आरोपीने त्याच्याशी संपर्क साधून ऑइल पुरवठ्याची मागणी केली. गावंडे यांनी आरोपीवर विश्वास ठेवून पुरवठा केला, परंतु पुरवठ्यानंतर पैसे न मिळाल्यामुळे त्यांना फसवणुकीचा संशय आला. त्यांनी पोलिसात तक्रार दिली. आरोपी सचिन शर्मा याच्याविरुद्ध मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

बापरे! एवढ्या रुपयांची केली फसवणूक | Shankhanaad News #shankhnaadnews #live

 

आरोपी बोकारा भागात भाड्याने खोली घेऊन राहतो आणि श्याम इंटरप्राईजेस नावाने कार्यालय असल्याचा दावा करत होता. मात्र, पोलिसांनी तपास केला असता, तेथे कोणतेही कार्यालय आढळले नाही. पोलिसांनी आता आरोपीचा शोध घेऊन त्याने आणखी कुठे फसवणूक केली का, याचा तपास सुरू केला आहे.