सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य, राहुल गांधींना नोटीस

0

लखनौ-भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना लखनौ जिल्हा सत्र न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. मोदी आडनाव प्रकरणात ते अडचणीत आले असताना आता या प्रकरणातही त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहे. Offensive statement on Savarkar, notice to Rahul Gandhi 
राहुल गांधी यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे सावरकरांविरोधात जाणीवपूर्वक आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणी १ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याच्या प्रकरणातील याचिका जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांनी स्वीकारली आहे. तसेच राहुल गांधी यांना नोटीसही पाठवण्यात आली आहे.