PM Vishwakarma Yojana : PM विश्वकर्मा योजनेचा लाभ कसा घ्यावा?

0

PM Vishwakarma Yojana : सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे. आणि अशीच एक योजना जी तुमच्या फायद्याची आहे याबद्दल  जाणून घेऊयात. ती योजना आहे पंतप्रधान विश्वकर्मा योजना.

प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं ही योजना सुरु केलीय. दरम्यान, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय यासंदर्भातील सविस्तर माहिती पाहुयात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदारांना श्रमिक पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्जदारांच्या त्रिस्तरीय पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाकडे आली आहे. त्यामुळे शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी करतील.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे काय?

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा गरजू गरिबांना चांगला फायदा होतो. या योजनेंतर्गत पारंपारिक व्यवसायांशी संबंधित तरुण कारागिरांना 18 व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन 500 रुपये भत्ता दिला जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये दिले जातील. याशिवाय त्यांना स्वत:चा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाईल.

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कर्ज मिळण्यासाठी पात्र उमेदवार कोण?

PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती संबंधित 18 क्षेत्रांमधील असणे आवश्यक आहे.
सुतार
बोट किंवा नाव बनवणारे
लोहार
टाळे बनवणारे कारागीर
सोनार
कुंभार
शिल्पकार
मेस्त्री
मच्छिमार
टूल किट निर्माता
दगड फोडणारे मजूर
मोची कारागीर
टोपली, चटई, झाडू बनवणारे
बाहुली आणि इतर पारंपारिक खेळणी उत्पादक
न्हावी
हार बनवणारे
धोबी
शिंपी
या 18 क्षेत्रांमधील व्यक्ती असणं आवश्यक आहे.

PM विश्वकर्मा योजनेचा अर्ज करत असाल तर…’हि’ गोष्ट लक्ष्यात ठेवा| Shankhnaad News #shankhnaadnews

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता

अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असावा.
अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक पासबुक
वैध मोबाईल नंबर
इत्यादी कागदपत्र असणं आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया काय ती बघुयात

अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा.
मुख्यपृष्ठावर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना हा पर्याय असेल.
येथे Apply Online पर्याय लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.
नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल.
यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि योग्यरितीने भरा.
भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
आता फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा.

PM Vishwakarma Yojana Online Apply 2024
PM Vishwakarma Yojana Registration
PM Vishwakarma Yojana 2024
PM Vishwakarma Yojana Login
विश्वकर्मा योजना
PM Vishwakarma gov in
PM Vishwakarma Yojana details
विश्वकर्मा योजना सिलाई मशीन