NAGPUR नागपूर : राष्ट्रीय ओबीसी OBC महासंघाचे अध्यक्ष व विदर्भातील ओबीसी नेते बबनराव तायवाडे Babanrao Taiwade यांनी शनिवारी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. सरकारने ओबीसींना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. ७ डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. त्याच धर्तीवर ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा करावी, अशी मागणी तायवाडे यांनी केली आहे. ओबीसींच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करू, असे आश्वासन २९ सप्टेंबरला शासनाने दिले होते. त्याची पूर्तता झाली नाही, याकडेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधण्यात आले.
Related posts:
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील मुलांसोबत साजरी केली दिवाळी
October 25, 2025MAHARASHTRA
कळमेश्वर गोंडखैरी उड्डाणपूलास मंजुरी-डॉ. राजीव पोतदार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
October 23, 2025MAHARASHTRA
Amarawati news : अतिवृष्टी मदत न मिळाल्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी !
October 23, 2025LOCAL NEWS













