आता टोलपासून मिळणार सुटका, सरकारचा नेमका प्लॅन काय ?

0

कुठेही जा वारंवार FASTag रिचार्जची गरज नाही

🧐 तुम्हाला माहिती असेल, फास्टॅगवरून टोल देणाऱ्यांनाही वारंवार रिचार्ज करावा लागत असल्याने वेळोवेळी अडचणीचा सामना करावा लागतो. पण आता यातून कायमची सुटका होणार आहे,

✍️ कारण सरकार टोलसाठी वार्षिक आणि लाईफटाईम पास काढण्याच्या तयारीत असून त्यावर सरकारी यंत्रणाकडून काम सुरू करण्यात आले आहे.

🤷‍♀️ पाहा कसा आहे हा प्लॅन ?

▪ केंद्र सरकार खासगी वाहनांसाठी वार्षिक आणि लाईफटाईम टोल पासची योजना आणायच्या तयारीत असून वार्षिक टोलची किंमत 3 हजार रूपये

▪ तर 15 वर्षांचा लाईफटाईम टोलची किंमत 30 हजार रूपये इतकी असू शकते. नेहमीच राष्ट्रीय महामार्ग अथवा एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे. कारण यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.

▪ हे नवीन सिस्टम FASTag सोबत जोडण्यात येईल. FASTag वरूनच तुम्ही वार्षिक अथवा लाईफटाईम पास खरेदी करू शकता. सध्या खासगी वाहनांना प्रतिमहिना 340 रूपये अथवा वार्षिक 4 हजार 80 रूपयांचा पास मिळतो.

▪ पण हि पास फक्त एकाच टोल प्लाजावर वापरता येते. मात्र 3 हजार रूपयांचा वर्षाचा पास घेतल्यास देशभरातली कोणत्याही हायवे अथवा एक्सप्रेसवर अमर्याद प्रवास करता येणार आहे.