आता वडिलांपूर्वी आईचे नाव लावावे लागणार!

0

(Baramati)बारामती– राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत असून आता मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे आईचे नाव लिहावे लागणार आहे. राज्यात चौथे महिला धोरण आणून महिलांचा सन्मान केला जाणार असून वडिलांच्या नावाआधी आता आईचे नाव लावले जाईल, अशी माहिती (Deputy Chief Minister Ajit Pawar)उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना दिली.

अजित पवार म्हणाले की, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले जाणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे. याआधी मुल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.