

बीड : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीला मुंबईत जाऊन आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा केली. संपूर्ण समाजबांधवांनी 20 तारखेला मुंबईच्या दिशेने निघायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. (Maratha Reservation) जे आमदार आणि खासदार मराठा आंदोलनासाठी साथ देत नाही, त्यांना यापुढे दारातही उभे करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
बीड येथील जाहीरसभेत जरांगे यांनी मुंबईतील उपोषणाची घोषणा केली. ते म्हणाले, राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करते आहे. आम्ही तरी किती दिवस दम काढणार? मराठ्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. २० जानेवारीपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. मराठा आंदोलनात जाळपोळ करू नका, जो जाळपोळ करेल तो आपला नाही, असे जरांगे म्हणाले.