आता वीज गळती रोखणे होणार शक्य

0

एनर्जी ऑडिट च्या माध्यमातून वीज गळती रोखणे शक्य – कुलकर्णी

अहमदनगर (Ahmednagar), 11 सप्टेंबर :- आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो अहमदनगर आणि पोलाद स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने अमित कुलकर्णी यांचे स्ट्रक्चरल ऑडिटची गरज आणि त्याचे फायदे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी बोलताना अमित कुलकर्णी यांनी एनर्जी ऑडिट म्हणजे योग्य प्रकारे एनर्जीचे जतन करणे,तसेच त्याचे योग्य पद्धतीने डाटा अनालिसिस करणे,गळती रोखणे या गोष्टी येतात. एनर्जी वाचविण्यासाठी योग्य प्रक्रिया करणे हा यातील मुख्य भाग असून एनर्जी ऑडिट मुळे इलेक्ट्रिसिटी खर्चात बचत,दंडात बचत,कार्यक्षमतेत वाढ,कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन मध्ये घट,ग्रीन हाऊस इफेक्ट कमी करणे हे फायदे होतात.

यामध्ये डाटा संकलन,प्लांटला भेट देणे,डाटा पुथकरण करणे आणि फॉलो अप हे भाग येतात. ओद्योगीक क्षेत्रात एनर्जी ऑडिट अतिशय महत्वाची भूमिका बजावत असून त्यामुळे मोठा आर्थिक फायदा होतो.आपण वापरत असलेली उपकरणे कोणत्या प्रकारची असावीत याबाबत एनर्जी ऑडिट मध्ये योग्य मार्गदर्शन केले जाते.

संस्था अध्यक्ष आदिनाथ दहिफळे यांनी सांगीतले की एनर्जी ऑडिट हा आर्किटेक्ट, सिव्हील इंजिनिअर आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठी महत्वाचा विषय असून मार्केट मध्ये नव्याने येणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील विविध विषयांचे सखोल नॉलेज सभासदांना असणे आवश्यक आहे.

पोलाद स्टील यांच्या सहकार्याने आयोजित नॉलेज सिरिजच्या माध्यमातून सभासदांना नवीन उत्पादने आणि प्रक्रिया यांविषयी सखोल मार्गदर्शन मिळते.

शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर सुरू केलेली ही नॉलेज सीरिज वर्षभर वेगवेगळ्या विषयावर सेमिनार घेऊन चालू ठेवण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात मयुरेश देशमुख, भुषण पांडव, नंदकिशोर घोडके, सचिन डागा, संतोष खांडेकर, गौरव मांडगे, संजय चांडवले, संजय पवार, एस यू खान, अशोक मवाळ, रमेश बोरुडे, प्रितेश पाटोळे, अजय दगडे, सुयोग पवार, आलोक जाजू, सागर ढगे, राकेश राऊत, विकार काझी, रवी शर्मा आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.