भारतात आता सर्वांना मिळणार पेंशन

0

केंद्र सरकार EPFO सोबत मिळून मोठा निर्णय घेण्याची शक्यता

▪️ आता केंद्र सरकार देशातील सर्व नागरिकांसाठी नवी पेन्शन योजना आणण्याच्या विचारात असून त्याला ‘युनिव्हर्सल पेन्शन स्कीम’ असे नाव दिल्याची चर्चा आहे. वृद्धापकाळात देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा त्याचा उद्देश आहे.

▪️ केंद्र सरकार देशातील सर्व नागरिकांसाठी, विशेषतः असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी, एक नवीन ‘युनिव्हर्सल पेन्शन योजना’ सुरू करण्याच्या विचारात असून सध्या बांधकाम कामगार, घरकाम करणारे कर्मचारी आणि ‘गिग वर्कर्स’ यांना केंद्र सरकारच्या पेन्शन योजनांचा थेट लाभ मिळत नाही. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगार, व्यापारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा, अशी सरकारची इच्छा आहे.

▪️ 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती यात सहभागी होऊ शकते. याचं वैशिष्ट म्हणजे ही ऐच्छिक योजना असणार आहे. या योजनेत सदस्यांना स्वत: देखील आर्थिक योगदान द्यावं लागेल, त्यानंतर त्यांना पेन्शन मिळेल. तुम्हाला यात योगदान द्यायचं असून तुमच्या योगदानावर तुम्हाला किती पेन्शन मिळणार हे ठरणार आहे.

▪️ ही योजना ईपीएफओ अंतर्गत आणण्याचा सरकारचा विचार आहे. या नवीन योजनेत प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना व्यापारी आणि स्वयंरोजगारांसाठीच्या या योजना विलीन केल्या जाऊ शकतात. त्यासंदर्भात पायाभूत सुविधांसंदर्भात काम सुरु असल्याची माहिती आहे. या संदर्भातील काम पूर्ण झाल्यास श्रम आणि रोजगार मंत्रालय इतर मंत्रालयांसोबत चर्चा करेल.