
बुलढाणा – कापूस व सोयाबीनला योग्य हमी भाव एक आठावड्यात सरकारने द्यावा अन्यथा 29 नोव्हेंबरला लाखो शेतकऱ्यांसमवेत मंत्रालयाचा ताबा घेऊ, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. तुपकरांच्या इशाऱ्यानंतर बुलढाणा पोलिसांनी 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे. या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीबाबत बोलताना रविकांत तुपकर म्हणाले. अशा नोटीसला मी भीक घालत नाही. अशा प्रकारच्या नोटीसांनी आमची कपाटं भरली आहेत. आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे. सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर लक्ष द्यावे यासाठी आम्ही मागणी करीत आहोत, आंदोलन छेडत आहोत. हा आमचा गुन्हा असेल तर अशा कितीही नोटीसा आल्या तर आम्ही घाबरणार नाही.