
बुलढाणा- सर्वोच्च न्यायाल्याच्या आदेशानुसार इंग्रजी नामफलक काढून मराठी अक्षरात लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील दुकान दारांनी आपल्या दुकानावर इंग्रजी अक्षरात नाम फलक लावले आहेत, ते काढून मराठी अक्षरात पाट्या लावाव्यात, यासाठी आता जिल्हा कामगार अधिकारी आणि त्यांची टीम जिल्ह्यातील सर्व इंग्रजी पाट्या लावलेल्या दुकानदारांना नोटीस देत आहेत. जर दुकानावरील पाट्या मराठीत लावल्या नाहीत, तर 1918 च्या 35 (1)(क) नुसार धडक कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा ते बजावत असल्याची माहिती ए. के. राठोड, कामगार अधिकारी, बुलढाणा यांनी दिली.