Tree Plantation : 33 नव्हे, ५२ कोटी झाडांची लागवड!

0

मुनगंटीवारांच्या कर्तबगारीवर
पुन्हा एकदा शिक्कामोर्तब

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Forest Minister Sudhir Mungantiwar) यांनी राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा निर्वाळा या प्रकरणात चौकशी करणाऱ्या समितीने दिला आहे. इतकेच नव्हे, तर या मोहिमेत ३३ कोटी नव्हे तर तब्बल ५२ कोटी झाडांची लागवड झाली असल्याची वस्तुस्थिती देखील या समितीने स्पष्ट केली आहे. परिणामी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या कर्तबगारीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

३३कोटी वृक्ष लागवड प्रकरणात चौकशी समितीने क्लीन चीट दिली आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात या मोहिमेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारने याबाबत आक्षेप नोंदविले होते. त्यानुसार या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानंतर वस्तुस्थिती पुरेशी स्पष्ट झाली आहे. लोकहितोपकारी अशा या वृक्ष लागवड मोहिमेत
कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सोबतच, राज्यात ही मोहीम यशस्वी झाल्याचे स्पष्ट मतही समिती सदस्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे वन विभागावार अकारण बसलेला ठपका, या स्पष्टीकरणाने मिटला आहे.

सखोल चौकशी अंती ‘क्लीन चीट’

राज्यात फडणवीस (Devendra Fadnavis)सरकारच्या काळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेची घोषणा केली होती. कालांतराने यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. परिणामी तत्कालीन वनमंत्री दत्ता भरणे यांनी या वृक्षलागवडीच्या चौकशीसाठी समितीची घोषणा विधानसभेत केली होती. या समितीने केलेल्या सखोल चौकशीअंती सादर केलेल्या अहवालात, कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. परिणामी 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट देण्यात आली असून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोडून काढण्यात आले आहे.

समितीच्या अहवालात नेमके काय?

– या प्रकरणात सखोल चौकशी केली असता कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नसल्याचे आढळून आले आहे.

– राज्यात मोहीम यशस्वी झाल्याचे समितीचे स्पष्ट मत आहे.

– मोहीम राबवताना काही अडचणी आणि त्रुटी राहिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

– त्रुटी आणि अडचणी दूर करण्यासाठी सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

– लहान रोपट्यांऐवजी मोठी रोपटी लावण्याची यात शिफारस करण्यात आली आहे.

– या मोहिमेमुळे राज्यात 52 कोटी वृक्ष लागल्याची जमेची बाजू या अहवालातून मांडण्यात आली आहे.

– खाणींच्या परिसरात झाडे लावण्याची शिफारसही समितीने या अहवालात केली आहे

benefits of tree plantation
more_vert
van mahotsav
tree plantation week
tree plantation posters
vriksharopan

Sudhir Mungantiwar cast
सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
Sudhir Mungantiwar cast
Sudhir mungantiwar marathi
Sudhir Mungantiwar personal assistant
Sudhir Mungantiwar daughter
Sudhir Mungantiwar PA name
Sudhir Mungantiwar family
Sudhir Mungantiwar contact number
Sudhir Mungantiwar property