

(Mumbai)मुंबई: देशात पुन्हा भाजपचीच सत्ता आणि भाजप साडेतीनशे ते चारशे जागा जिंकल्यास आश्चर्य वाटणार नाही असे भाकीत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वर्तविले आहे एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नाना पाटेकर (Senior Actor Nana Patekar) एका वाहिनीशी बोलत असताना त्यांना २०२४ च्या निवडणुकीबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता उत्तर दिले.
भाजप मोठ्या फरकाने जिंकून येईल, असे भाकीत करून नाना पाटेकर म्हणाले, आता नेमक्या कुठल्या जागा येतील सांगता येणार नाही, पण दुसरा कुठला पर्यायच नाही तुमच्यासमोर. देशात उत्तम काम होत आहे. भाजपने साडेतीनशे ते पावणे चारशे जागा जिंकल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही, असेही ते म्हणाले.