
नागपूर- मुळात हा भीषण अपघात का झाला त्याची कारणे शोधणे महत्वाचे आहे.समृद्धी महामार्गावर काम अर्धवट असतांना घाई नको होतो. सर्वत्र सर्व सुविधा सुरू झाल्यानंतर हा रस्ता सुरू करण्याची गरज होती. त्या मार्गावर रेस्ट रूम नाही, विश्रांती घेण्यासाठी सुविधा नाहीत, यामुळेच समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झालाय हे कोणी नाकारू शकत नाही असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
माध्यमातून टीका होऊनही घाई गडबडीत काम करण्यात आले. त्यामुळे निष्पाप लोकांचा बळी आज जात आहेत. हे अपघात सरकारच्या घाईमुळे होत आहेत. सदोष काम नाही, यात तांत्रिक अडचणी आहेत.
समृद्धीची वाहतूक थांबवावी समृद्धीमार्ग सुरू ठेवायचा की नाही यावर विचार झाला पाहिजे.
मनोज जरांगे यानी सरकारला दिलेल्या इशाऱ्यावर बोलताना सरकारने वेळ देऊन फसवणूक का केली, सरकार समाजाना खेळवत ठेवण्याचे काम करत आहे. उद्या नागपुरात विदर्भातील सर्व ओबीसी संघटनाची 11वाजता बैठक होणार आहे. यात 40 संघटनां असणार आहेत.
आरक्षण 10 दिवसात देता येतं का? पुन्हा तोंडाला पान पुसली जात आहेत का? ही जवाबदारी सरकारची आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नये ही आमची मागणी आहे मात्र, वारंवार भूमिका बदलणारे अनेक नेते तयार झालेले आहेत असे टीकास्त्र विरोधकांवर सोडले. सदावर्ते कुणाचा माणूस आहे हे दरेकर यांनी सांगावे
कुठली चाचणी करता येईल तर तेही करून पाहावे ,सदावर्ते नेमका कोणाचा?आरोप करण्यापेक्षा कोणाची भाषा बोलत आहे. सदावर्ते हे सरकारची भाषा बोलत आहे, सदावर्ते हे सरकारची भाषा बोलत आहे हे लपून नाही. सदावर्ते हे आता सत्ताधाऱ्यांची भाषा बोलत आहेत.मराठा समाजाला आराक्षण देण्याचा विषय देवेंद्र फडणवीस यांनीच पुढे आणला होता. मग त्यावेळेस तुम्ही आश्वासन का दिलं हे त्यांनी आता सांगितलं पाहिजे.त्यांनी आश्वासन दिल्यामुळे आज हा समाज रस्त्यावर आला त्याचवेळी आरक्षण देऊ शकत नाही असं जर सांगितलं असते तर आज हा एवढा विषय चिघळला नसता असे वडेट्टीवार
यांनी स्पष्ट केले.