

अटल सेतूवर 14 पदरी रस्ता करणार
गरीबांचे जीवनमान सुधारल्या शिवाय आत्मनिर्भर होणे शक्य नाही
अटल सेतूवरुन खाली उतरल्यानंतर 14 लेन रस्ता तयार करणार आहे. बंगळूर, संभाजीनगर जाणार आहे. पुणे रिंग रोडला तो रस्ता जोडला जाणार आहे, याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, आम्ही रस्ता कचरा वापरतो. 80 लाख टन कचरा वापरून रस्ता तयार करण्यात आलाय. येणाऱ्या काळात अनेक क्षेत्रांत रिसर्च करण्यासाठी वाव आहे. गाव खेड्यातील शेतकरी, गरीबांचे जीवनमान सुधारल्या शिवाय आत्मनिर्भर होणे शक्य नाही. ग्रामीण भागात नवीन संशोधन झाले त्यातून रोजगार निर्माण झाला. लोकं शहरात येणार आहेत. मी जे करु शकलो ते केवळ हिंमत माझ्याकडे होती म्हणून करु शकलो. हातात पैसे मिळालं पटापट काम होते. जेवढं वजन टाकल तेवढं पटापट काम करतात, असंही नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले, आम्ही रस्ता कचरा वापरतो. 80 लाख टन कचरा वापरून रस्ता तयार करण्यात आलाय. येणाऱ्या काळात अनेक क्षेत्रांत रिसर्च करण्यासाठी वाव आहे. गाव खेड्यातील शेतकरी, गरीबांचे जीवनमान सुधारल्या शिवाय आत्मनिर्भर होणे शक्य नाही. ग्रामीण भागात नवीन संशोधन झाले त्यातून रोजगार निर्माण झाला. लोकं शहरात येणार आहेत.
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, मी बांधकाम मंत्री होतो त्यावेळी यांची सुरुवात झाली. अभियंता दिवस. कुणाची प्रभावाखाली नं येता पुरस्कार द्या, असं सांगितलं. विश्वेश्वरय्या यांनी महाराष्ट्रात 28 वर्ष काम केले. त्यानंतर ते गुजरातमध्ये गेले अनेक मोठे कामे केली. विश्वेश्वरय्या यांची आज जयंती आपण अभिवादन करत आहोत. आपला भारत जगात तीन नंबर आहोत. सगळ्यात जास्त जीएसटी भरणारी इंडस्ट्री आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट रिसर्च आहे. आज सर्वत्र गाड्या दिसतं आहे. पुढाच्या पंचवीस वर्ष डिझेल गाड्या दिसणार आहेत.
लिठियेन बॅटरी साठा जम्मू काश्मीरमध्ये सापडला आहे. पुढच्या दोन वर्षात जगाचे सेमी कंडक्टर हब बनवणार आहोत. जपान विचारले तुमचे अभियता हुशार कसे असतो. त्याच गणितं जीन्स अस्ताता का? जगातील सर्वात तरूण इंजिनिअर भारतमध्ये आहे. ती आपली ताकत आहे. पेट्रोल डिझेल जास्त पैसे जातं आहे. संशोधन करून हे खर्च कमी होईल, असंही गडकरी यांनी सांगितलं.