
मुंबई MUMBAI : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई Internationally renowned art director Nitin Desai यांनी त्यांच्या कर्जतमधील ND एनडी स्टुडीओत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ते ५८ वर्षांचे होते. नितीन देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी प्रचंड हादरली आहे. ते लोकप्रिय कलादिग्दर्शक तर होतेच पण निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये, इतिहासकालीन मालिकांमध्ये कला दिग्दर्शनाचे काम केले आहे.
नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी, हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचे काम केले होते. यामध्ये जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, प्रेम रतन धन पायो, ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या सुपरहिट सिनेमाचे त्यांनी कला दिग्दर्शन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील अनेक राजकारण्यांपर्यंत नितीन देसाई यांचे चांगले संबंध होते. अंशीच्या दशकात देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला व नंतर अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले.
नितीन देसाई यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यक्तिगत संबंध होते. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी मोदींना कमळातून भाजपाच्या कार्यकत्यांसमोर पेश केले होते.
आर्थिक विवंचना?
नितीन देसाई यांच्या आत्महत्येचं नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, नितीन देसाई यांच्या एन. डी. स्टुडिओवर तब्बल २४९ कोटींचं कर्ज असल्याची बाब आता समोर आली आहे. त्यांच्या स्टुडिओवर जप्तीची कारवाईही प्रलंबित होती. यासंदर्भाच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्णय येणे अपेक्षित होता, असे सांगण्यात येत आहे.













