उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ निष्ठा यात्रा

0

 

वर्धा – शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी वर्ध्यातून सायकलने शिवसैनिकांची निष्ठा यात्रा निघाली आहे. युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात आज वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही यात्रा निघाली. युवा परिवर्तन की आवाज संघटना आणि उद्धव ठाकरे गट शिवसेना या यात्रेत सहभागी झाले असून वर्धा ते मुंबई 864 किलोमीटर अंतर कापत 9 दिवसात ही यात्रा मातोश्री येथे पोहचणार आहे. बेरोजगारी, उद्योगांची अवस्था, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, घरकुल व आरोग्याच्या समस्या यावर जनजागृती या यात्रेमधून करण्यात येणार आहे.