निमा द्वारा पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली

0

(Chandrapur)नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) चंद्रपूर शाखेद्वारा जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी श्रध्दांजली सभेचे आयोजन निमा चंद्रपूर शाखेचे कोषाध्यक्ष डॉ नितीन बिश्वास यांच्या दवाखान्यात करण्यात आले. याप्रसंगी सर्व सदस्यांनी मेणबत्ती लावुन दोन मिनिटे मौन धारण केले व सर्व मृतात्म्यांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. या सभेत निमा चंद्रपूर शाखेचे अध्यक्ष डॉ दिपक भट्टाचार्य, कोषाध्यक्ष डॉ नितीन बिश्वास, उपाध्यक्ष डॉ विजय भंडारी,वुमेन्स फोरम च्या सचीव डॉ मनीषा घुगल, माजी अध्यक्ष डॉ लक्ष्मीनारायण सरबेरे, डॉ प्रदीप मोहुर्ले, तसेच सदस्य डॉ यशवंत सहारे, डॉ अमीत कोसुरकर, डॉ पज्ञशील सहारे, डॉ जतीन लेनगुरे, डॉ रोहित निखाडे, डॉ श्रीकांत अकोटकर यांची उपस्थिती होती.