स्टार स्पोर्टस फाऊंडेशनच्या निधी सामंतला सुवर्णपदक

0

Nidhi Samantha of Star Sports Foundation wins gold medal in national swimming competition मुंबई ( Mumbai), 15 ऑगस्ट भुवनेश्वर येथे झालेल्या स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ४० व्या सबज्युनिअर आणि ५० व्या जूनियर स्पर्धेंत महाराष्ट्र संघाकडून खेळताना ठाण्याच्या स्टार स्पोर्टस फाऊंडेशनच्या निधी तुषार सामंत (Nidhi Tushar Samant) हिने घवघवीत यश संपादन केले. निधी सामंत हिने 1 सुवर्ण, 4 रौप्य व 1 कांस्यपदक पटकाविले.

निधी तुषार सामंत ही जानकीनगर कळवा येथे वास्तव्यास असून ती कळवा सहकार विद्या प्रसारक मंडळ या शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे.

ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलाव येथे स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडे घेत आहे.

महाराष्ट्र संघातून निवड झालेल्या निधी सामंतच्या या यशाबद्दल तिचे महाराष्ट्र संघ व्यवस्थापक अजय पाठक, राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने, फेडरेशनच समन्वयक व राज्य संघटना सचिव राजेंद्र पालकर, उपाध्यक्ष राजेश मोरे, ठाणे महापालिकेच्या क्रीडा अधिकारी तथा उपायुक्त मीनल पालांडे, तरण तलाव व्यवस्थापक रिमा देवरुखकर, उपव्यवस्थापक रवी काळे यांनी कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.