

बेंगळुरू बॉम्बस्फोट तपासांतर्गत एनआयएची छापेमारी
NIA raids in Rameshwaram cafe blast case
21 मे : कर्नाटकातील बेंगळुरू इथल्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज, मंगळवारी अनेक राज्यांमध्ये छापे टाकले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुसाविर हुसैन साजिब आणि अब्दुल मतीन ताहा या 2 प्रमुख सूत्रधारांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे छापे टाकण्यात येत आहेच्या रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. याप्रकरणी मुसाविर हुसैन साजिब आणि अब्दुल मतीन ताहा यांना 12 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात अनेक ग्राहक आणि कर्मचारी जखमी झाले. यातील काही जणांना गंभीर दुखापत झाली होती. अनेक राज्यांमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. ताहा, मुसावीर हुसेन शाजिब आणि अन्य आरोपींना कोलकाताजवळील एका लॉजमधून अटक करण्यात आली.
तो येथे बनावट ओळख घेऊन राहत होता. या तिन्ही आरोपींनी कॅफेमध्ये इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) ठेवल्याचा आरोप आहे. वास्तविक, काउंटरजवळ ठेवलेल्या बॅगेत आयईडीचा स्फोट झाला. ही बॅग कोणी ठेवली होती, हे आधी कळले. ही बॅग घेऊन एक व्यक्ती तुमाकुरू बसमध्ये चढल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. साजिब अशी त्याची ओळख पटली.पोलिसांनी घटनास्थळावरून बॅटरी आणि टायमरही जप्त केला होता.
आता या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या संपर्कात असलेला कर्नल कोण याचा शोध एजन्सी घेत आहे. त्याचा थेट आयएसआयएसशी संबंध असण्याची शक्यता आहे. ताहा आणि साजिब यापूर्वी आयएसच्या अल हिंद मॉड्यूलचा भाग होते. दक्षिण भारतातील जंगलातही तो दीर्घकाळ वास्तव्यास असल्याचे एनआयएच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. हे मॉड्यूल बेंगळुरूचे रहिवासी मेहबूब पाश आणि खाजा मोईदीन चालवत होते.