वायसीसीईमध्‍ये ‘नेक्स्टजेन इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह’ संपन्‍न

0

नागपूर (Nagpur), 2 मार्च 2025
यशवंतराव चव्‍हाण कॉलेज ऑफ ऑफ इंजिनीयरींग (वायसीसीई) मध्‍ये विविध उद्योगांचे संचालक, उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रकल्प प्रमुख आणि एचआर व्यावसायिकांसाठी एक दिवसीय ‘नेक्स्टजेन इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह 2025’ चे आयोजन केले. कॉर्पोरेट सिनर्जीच्या माध्यमातून भविष्यातील अभियंत्यांना सक्षम बनवण्‍याच्‍या उद्देशाने आयोजन या चर्चासत्राला उत्‍स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्‍या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.पी. वाघे यांचे स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर संचालक (तांत्रिक) आणि सल्लागार (एमजीआय) डॉ. मनाली क्षीरसागर यांच्‍या नेतृत्‍वात चर्चा पार पडली.

चर्चासत्रांमध्‍ये आयटी प्रतिनिधी व प्रमुख उद्योग व्‍यावसायिकांसाठी दोन पॅनल चर्चांचे आयोजन करण्‍यात आले होते. पहिल्‍या आयटी प्रतिनिधींसाठीच्‍या पॅनेल चर्चेचा विषय “कॉर्पोरेट वर्ल्ड इनकॉर्पोरेटिंग जेनझेड्स” हा होता. डॉ. श्वेता धोंडसे यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. तर दुस-या पॅनेल चर्चेचा विषय “अनलॉकिंग द पॉवर ऑफ कोअर इंजिनियर्स” हा होता. या सत्रांचे संचालन डॉ. एस.एस. खेडकर यांनी केले.

इंडस्ट्री कॉन्क्लेव्हचे नियोजन आणि आयोजन टी अँड पीचे संचालक नीरज वखरे व अधिष्‍ठाता डॉ. राखी वाजगी यांनी वायसीसीई व्यवस्थापनाच्या सहकार्याने केले.