

नागपूर (Nagpur) दिनांक: 27/08/25 :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर येथील गणेश पेठ कार्यालयात नवनियुक्त शहर अध्यक्ष श्री. अनिल अहिरकर व प्रदेश महासचिव तानाजी वनवे यांचे उत्साहपूर्ण आणि भव्य स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाला पक्षाचे विविध विभागातील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांची उपस्थिती होती. स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पहार, ढोल-ताशांच्या गजरात नवनियुक्त अध्यक्षांचे आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान श्री. अनिल अहिरकर यांनी पक्षवाढीसाठी व जनतेच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नव्या नेतृत्वाचे स्वागत करताना उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. श्री. प्रफुलभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुनील तटकरे, तसेच नागपूर जिल्ह्याचे निरीक्षक मा. श्री. राजेंद्र जैन यांचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी मनःपूर्वक आभार मानले व अनिल अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कार्य बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी महिला अध्यक्षा सुनीता येरणे, युवक अध्यक्ष विशाल खांडेकर,तानाजी वनवे आनंद सिंग लक्ष्मी सावरकर,सोहेल पटेल, बजरंग सिंग परिहार, जानबा मस्के, समीर रहाटे, मालुताई वनवे, माधुरी पालीवार, अमरीश ढोरे, राकेश बोरीकर, अरविंद भाजीपाले, रमेश फुले लक्ष्मीकांत पांडे राजू मिश्रा निलेश बोरकर अनिता वर्मा, मुमताज बाजी, शहाजी बाजी, पुंडलिक राऊत, राहुल कांबळे, नागेश देळमुठे, मेहबूब पठाण, एकनाथ फलके, जगदीश पंचपुडे, दिनेश रोडगे, विशाल गोंडाणे, भारती गायद्यने, ब्रह्मानंद मस्के, अंजुमन शेख, असे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.