नवीन संसद म्हणजे ‘मोदी मल्टिप्लेक्स’ – खा संजय राऊत यांची टीका

0

 

मुंबई: संसदेमधील नियम हे सर्वांना एकच असले पाहिजेत. मुळात संसद भवन हे कुठल्या एका ग्रुपचे नाही. कोणाच्या विचारधारेचे नाही. जातं धर्मावर टिपणी केली जाते अशी व्यक्ती संसदमध्ये नसली पाहिजे. संसदेत संविधान पालन ही आपली जबाबदारी आहे मात्र नवीन संसद भवन म्हणजे मोदी मल्टिप्लेक्स झाल्याची टीका सेना नेते खा संजय राऊत यांनी केली आहे.
जुन्या संसद भवनामध्ये असं वाटत होते की आपण ऐतिहासिक संसदेत आलो आहोत. मात्र या नवीन ठिकाणी असं जाणवत नाही. पैसे खर्च केले मात्र खासदारांसाठी कुठलीही सुविधा नाही.लॉबी नाही, सेंट्रल हॉल नाही. उत्तम लायब्ररी नाही. मग बनवले कशासाठी ? तुमच्या सोयीसाठी ? तुमच्या अर्थात राजाच्या मनात एक लहर आली एक संसद भवन बनवलं असा हा प्रकार आहे. हे भारतीय जनता पक्षाचं कल्चर आहे. राजनाथ सिंग यांनी त्या भाषण संदर्भात माफी मागितली आहे, मात्र  हर्षवर्धन आणि डॉक्टर रविशंकर प्रसाद जे ज्येष्ठ नेते आहेत हे बाजूला बसणारे लोक हसत होते हा प्रकार निषेधार्ह आहे.
लोकशाही या चैनलवर ज्या पद्धतीने घाईगर्दीने बंदी प्रयत्न  टाकण्याचा प्रयत्न केला गेला. हा प्रकार मागच्या दारातून आणीबाणीचा आहे. स्वतंत्र वाहिन्यांच्या मीडियाचा गळा घोटण्याचे काम आहे. दिल्ली हायकोर्टाने त्या संदर्भात योग्य भूमिका घेतली आणि ती बंदी उठवली. आम्हाला न्यायालयाकडूनच अपेक्षा आहेत