अ. भ. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत ची नवीन कार्यकारणी घोषित

0

डॉ. नारायण मेहरे ग्राहक पंचायत च्या प्रांताध्यक्ष पदी, चारुदत्त चौधरी सचिव तर अभय खेडकर प्रांत संघटन मंत्री  पदी नियुक्ती

भंडारा प्रतिनिधी…..!!!!!: अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या विदर्भ प्रांताध्यक्ष पदी डॉ. नारायण मेहरे यांची दुसर्‍यांदा अविरोध निवड करण्यात आली. सचिव पदी अमरावतीचे चारुदत्त चौधरी तर कारंज्या चे अभय खेडकर यांची विदर्भ प्रांत संघटन मंत्री म्हणून निवड करण्यात आली. रविवार दि २५ मे रोजी नागपूरच्या धरमपेठ महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या विदर्भ प्रांत कार्यकारिणीच्या सभेत अ.भा.  ग्राहक पंचायतीचे पाश्चिम क्षेत्रीय संघटक नितीन काकडे यांनी केंद्राच्या निर्देशानुसार पुढील तीन वर्षासाठी या प्रांत स्तरीय नियुक्तया घोषित केल्या.

दुसऱ्यांदा नवनियुक्त प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी उर्वरित कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात उपाध्यक्ष म्हणुन श्रीपाद भट्टलवार (नागपूर), नगीनदास बैरागी (मलकापूर), सहसचिव पदी विलास ठोसर (नागपूर), आनंद संगई (अंजनगावसुर्जी) तर कोषाध्यक्ष म्हणुन संजय धर्माधिकारी (नागपूर) आणि संतोष डोमाळे (यवतमाळ) यांची निवड करण्यात आली आहे. नागपूरच्या  तृप्ती आकांत महिला आयाम प्रमुख तर खामगावच्या अँड विनिता सावजी विधी आयाम च्या प्रमुख राहतील. यवतमाळचे विरेंद्र चौबे आणि मौदा (नागपूर) चे तुकाराम लुटे हे प्रचार प्रमुख म्हणुन जबाबदारी सांभाळतील. तसेच नागपूरचे प्रकाश भुजाडे यांची प्रांत कार्यालय प्रमुख, संजय आयलवार (भंडारा) पर्यावरण प्रमुख म्हणुन तर अनिल मिश्रा (वर्धा) आणि बाबू भाई शेख यांना रोजगार सृजन च्या प्रमुख पदी नेमण्यात आले आहे. चंद्रशेखर साठे (भंडारा) यांची प्रांत आयटी सेल प्रमुख म्हणुन प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी नियुक्ती केली आहे.
डॉ. शोभा गायकवाड अमरावती, हितेश सेठ यवतमाळ, विजय बहाकार अकोला, प्रशांत पाचपोहोर, काटोल, कविता लिचडे गोंदिया, किशोर मुटे वर्धा, चंद्रकांत पतरंगे गडचिरोली आणि वसंत वरहाटे भद्रावती याची प्रांत कार्यकारिणीच्या सदस्य पदी निवड जाहीर करण्यात आली आहे.