

(nagpur)नागपूर : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी संपल्यावर आता निकालाची प्रतीक्षा आहे. (Shivsena MLA Disqualification Case) या प्रकरणाचा निकाल १० जानेवारी रोजी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात सरकारमध्ये नेतृत्वबदल होणार असल्याचा दावा केला आहे. (Vijay Wadettiwar)
वडेट्टीवार म्हणाले की, १० तारखेच्या निकालानंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या बोहल्यावर बसेल, मुख्यमंत्री बदलणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक जण बाशिंग बांधून बसले आहेत. अनेकांनी कपडे शिवून ठेवले आहेत, असेही ते म्हणाले. आम्ही निवडणुकीची तयारी करीत आहोत. जागावाटपासाठी उद्या दिल्लीत महाराष्ट्र राज्याची बैठक आहे. आमच्या पक्षाच्या सर्व्हेत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही ३० पेक्षा अधिक जागा जिंकू शकतो, असे अंदाज आले आहेत. विदर्भातून काँग्रेसला साथ मिळेल व विदर्भातून आम्ही दहा पैकी सात जागा जिंकू, असा विश्वास वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.