

नेपाळ:-नेपाळमध्ये (Nepal) एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. भारतीयांना घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत (Marsyangdi River) कोसळली. अपघातग्रस्त बस पोखराहून काठमांडूला जात होती, अशी माहिती नेपाळच्या एका अधिकाऱ्याने दिली. सशस्त्र पोलीस दलाचे प्रवक्ते शैलेंद्र थापा यांनी सांगितले की, बसमधून बाहेर काढण्यात आलेल्यांपैकी 24 जणांना मृत घोषित करण्यात आले आहेत.
नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद
नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील 24 जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याअपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने उद्या शनिवारी 24 जणांचे मृतदेह नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात येणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये दुर्घटना झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी राज्यातील मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी, केंद्रीय अधिकारी यांच्याशी सातत्याने संवाद साधत मदतीच्या कामाची माहिती घेतली.
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांच्याशी संवाद साधून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याकरिता विनंती केली होती. याप्रकरणी राज्याला सर्वतोपरी मदत करू. त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्या हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.
नेपाळ पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ४० प्रवाशांना घेऊन जाणारी एक भारतीय प्रवासी बस शुक्रवारी तानाहुन जिल्ह्यातील मर्स्यांगदी नदीत कोसळली. तानाहुन येथील जिल्हा पोलिस कार्यालयाचे डीएसपी दीपकुमार राया यांनी सांगितले की, ‘नंबर प्लेट यूपी एफटी ७६२३ क्रमांक असलेली बस मर्स्यांगडी नदीत कोसळली. ही बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होती.’
#WATCH | Nepal: An Indian passenger bus with 40 people onboard has plunged into the Marsyangdi river in Tanahun district. The bus was en route to Kathmandu from Pokhara. Search and rescue operations underway by the Nepal Army at the incident site.
(Video Source: News Agency… pic.twitter.com/txxO43O4CV
— ANI (@ANI) August 23, 2024
नेपाळमध्ये भारतीय प्रवासी बस नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत शोध आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी नेपाळी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर वैद्यकीय पथकासह अपघातस्थळी रवाना झाले आहे.नेपाळ लष्कराच्या दळणवळण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळी लष्कराच्या हेलिकॉप्टरने काठमांडूयेथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हेलिपॅडवरून अपघातस्थळाकडे उड्डाण केले. नेपाळी लष्कराचे प्रवक्ते गौरब कुमार केसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघातस्थळाजवळ उतरले आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी याच हेलिकॉप्टरने काठमांडूला परत पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवक्त्याने एएनआयला फोनवरून दिली.
Nepal | An Indian passenger bus with 40 people onboard has plunged into the Marsyangdi river in Tanahun district, confirms Nepal Police.
“The bus bearing number plate UP FT 7623 plunged into the river and is lying on the bank of the river,” DSP Deepkumar Raya from the District…
— ANI (@ANI) August 23, 2024
उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘नेपाळमधील पोखरा हून काठमांडूला जात असताना गोरखपूरहून एका खासगी बसला अपघात झाल्याची दु:खद बातमी मिळाली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि जखमींना लवकर बरे व्हावे, यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो.
प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते… https://t.co/dnBWB8goKx— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 23, 2024