भालाफेक पटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकियो ऑलिम्पिकनंतर आता लॉसने डायमंड लीगचा खिताब पटकावला आहे. त्यानं 87.66 मीटर अंतरावर भालाफेक फेकून लॉसने डायमंड लीगवर आपलं नाव कोरलं आहे. काही महिन्यांपूर्वी दुखापतीमुळे त्याला एफबीके गेम्स (FBK Games) आणि पावो नूरमी गेम्स (Paavo Nurmi Games) ला मुकावे लागले होते.पण या दुखापतीतून बाहेर आल्यानंतर तो थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सलग दोन स्पर्धेत भारताला विजय मिळवून देण्यात त्याला यश आलं आहे. (Neeraj Chopra wins gold medal in Lausanne Diamond League with 86 77 metre throw)