राष्ट्रवादी काँग्रेसची पदयात्रा व स्वच्छता अभियान

0

 

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) वतीने आज गांधी गेट जवळून बँड वाजवून पदयात्रा व स्वच्छता अभियान राबवत आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष,प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेत प्रशासकीय राज सुरू असल्याने सध्या शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. यासाठी आम्ही आज प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करत असल्याचे प्रशांत पवार म्हणाले.