राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक

0

 

खासदार निलंबनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक

(Amravati)अमरावती- केंद्र सरकारने संसदेच्या दोन्हीही सभागृहातील खासदारांना निलंबित केल्यामुळे या विरोधात आज अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar)शरद पवार गटाच्या वतीने बैठा सत्याग्रह करण्यात आला. केंद्र सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या खासदारांना अशाप्रकारे निलंबित करणे योग्य नसल्याचे सांगत यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देशात लोकशाही असून ती कुणीही संपवू शकत नाही, असेही यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर व जिल्हा ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. प्रदीप राऊत, माजी प्रदेश चिटणीस महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस यांनी नेतृत्व केले.