गडचिरोली : नक्षलवाद्याकडून पोलिस पाटलाची हत्या

0

Naxsl kills trible villager

गडचिरोली,  GADHCHIROLI 24नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील टिटोळा येथील पोलीस पाटलाला नक्षलवाद्यांनी गोळी मारून ठार केले आहे. जांबिया आणि अंडगे रोडवर आज सकाळच्या सुमारास मृतदेह आढळून आला. हत्या झालेल्या पोलीस पाटलाचे नाव लालसू वेळधा वय 53 असे असून मृतदेहाच्या जवळ नक्षलवाद्यांनी पत्रक टाकून सुरजागड चा दलाल व पोलीस खबऱ्या असल्याच्या कारणावरून हत्या करण्यात आली असे भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी गडचिरोली यांनी टाकलेल्या पत्रकात लिहिले आहे. त्यासोबत राजकीय नेते व पोलीस अधिकाऱ्यांवर सुरजागडखानीच्या समर्थनात काम करतात म्हणून पत्रकात टीका केली आहे.