Breaking : या परिसरातील चकमकीत १२ नक्षलवादी ठार

0

Naxalites Encounter in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात २ जवान जखमी झाले आहेत.

छत्तीसगड राज्यातील बीजापूर जिल्ह्यातील पिडिया परिसरात शुक्रवारी सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांविरोधात मोठे ऑपरेशन राबवले गेले. यामध्ये १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. त्याचबरोबर या चकमकीत २ जवान जखमी झाले आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी १२ नक्षलवादी मारले गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी सांगितले की, बीजापूर जिल्ह्यातील गंगालूर परिसरात सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. या कारवाईसाठी जवान व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभिनंदन.(Naxalites Encounter in Chhattisgarh 🙂

या अभियानात सुकमा, बीजापूर आणि दंतेवाडामधील DRG व कोबरा फोर्सच्या २१० बटालियन व STF च्या जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक सामुग्री व शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

 

त्याआधी या चकमकीबाबत माहिती देताना दक्षिण बस्तरचे पोलीस उप महानिरीक्षक कमलोचन कश्यप यांनी म्हटले की, परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. पोलीस दल अजूनही जंगलात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या चकमकीत जिल्हा रिझर्व्ह गार्ड (DRG) आणि स्पेशल टास्क फोर्स (STF) ने महत्वाची भूमिका निभावला. सकाळपासून सायंकाळपर्यंत अनेक वेळा नक्षलवादी व जवानांमध्ये चकमक झाली.