Naxal Encounter News : गेल्या नऊ महिन्यात किती नक्षलींचा झाला खात्मा?

0

Naxal Encounter News: छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर गेल्या नऊ महिन्यात तब्बल 183 नक्षलींचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.Naxal Encounter News: छत्तीसगड, महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांची कंबर अक्षरशः तुटली आहे. स्थानिक नागरिकांनी नक्षलवाद्यांना मदत करणे बंद केले आहे. स्थानिक तरुणांना आता बंदुकीपेक्षा विकास प्रकल्प आणि त्याच्यातून निर्माण होणारे रोजगार आकर्षित करत आहे. त्यामुळेच गेल्या पाच  वर्षात एकही स्थानिक तरुणाला नक्षल दलममध्ये रुजू (recruit) करू शकलो नसल्याची कबुली गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे नेतृत्व करणाऱ्या आणि  सरसेनापती मानल्या जाणाऱ्या ‘कोला तुमरेटी उर्फ नांगसू उर्फ  गिरधर’ ने केला आहे.

दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात पोलिसांना दिलेले कारवाईचे आदेश बघता पोलिसांनी अनेक कारवाई करत नक्षल्यांचे तळ उधवस्त करत नक्षलींचा खात्मा केला आहे. यात गेल्या नऊ महिन्यात तब्बल 183 नक्षलींचा खात्मा करण्यात छत्तीसगड आणि महाराष्ट्र पोलिसांना यश आले आहे. किंबहूना अजूनही नक्षलींचा बिमोड करण्याच्या अनुषंगाने पोलीसांनी कठोर पाऊले उचलेल आहे. तर दुसरीकडे माओवाद्यांच्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या आत्मसमर्पण योजनेला ही मोठे यश आल्याचे दिसून आले आहे.

नऊ महिन्यात तब्बल 183 नक्षलींचा खात्मा

*20-21 जानेवारी 2025- गरियाबंदमध्ये 80 तास चालले ऑपरेशन, 16 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.

 

* 16 जानेवारी 2025- विजापूर जिल्ह्यात पुजारी कांकेर चकमक झाली, त्यात 18 नक्षलवादी ठार झाले.

 

* 22 नोव्हेंबर 2024 – सुकमा जिल्ह्यात 10 नक्षलवादी ठार

 

* 4 ऑक्टोबर 2024- थुलाथुली चकमक, 38 नक्षलवादी ठार

 

* ३ सप्टेंबर  2024- दंतेवाडा येथे 9 नक्षलवादी ठार

 

* 15 जून 2024- अबुझमाडमध्ये 8 नक्षलवादी ठार

 

* 23 मे 2024- अबुझमाडच्या रेकावाया येथे 8 नक्षलवादी ठार

 

* 10 मे 2024- विजापूरच्या पामेड भागात 12 नक्षलवादी ठार.

 

* 29 एप्रिल 2024- नारायणपूरमध्ये 10 नक्षलवादी ठार

 

* 16 एप्रिल 2024- कांकेरमध्ये 29 नक्षलवादी ठार

 

* 2 एप्रिल 2024- कोरचोली, विजापूर येथे 13 नक्षलवादी ठार

 

छत्तीसगडमध्ये पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक, आतापर्यंत 31 नक्षल ठार

अशातच, आज (9 फेब्रुवारी) गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या विजापूर जिल्ह्याच्या इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्याच्या जंगलात झालेल्या चकमकीत आतापर्यंत 31 नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईत दोन जवान हुतात्मा झाले असून दोन जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, कारवाईची तीव्रता पाहता ठार नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलाचे संयुक्त अभियान सुरु आहे.