नवनाथ विद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रम साजरा

0

शाळेतील विद्याथ्र्यांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर लावली झाडे

अहमदनगर(Ahmednagar), 8 जुलै:- सामाजिक वनीकरण विभाग परीक्षेत्र अहमदनगरच्या वतीने वन महोत्सव उपक्रमातंर्गत निमगाव वाघा (तालुका नगर) येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करुन एक पेड माँ के नाम ही संकल्पना राबवित शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणद्गावर झाडे लावली.नवनाथ विद्यालय,स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था,श्री नवनाथ युवा मंडळ,धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी वनरक्षक अप्सर पठाण,ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे,मुख्याध्यापक उत्तम कांडेकर,अमोल वाबळे,मंदा साळवे,प्रमोद थिटे,संतोष रोहोकले,तेजस केदारी,भानुदास लंगोटे,मयुरी जाधव,युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे,प्रशांत जाधव आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.अप्सर पठाण म्हणाले की,पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागामार्फत वन महोत्सव साजरा करण्यात येतो.या अभियानातंर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करुन ती जगविली जात आहे.दिवसंदिवस तापमानात वाढ होत चालली असून,वाढते तापमान नियंत्रित करण्यासाठी वृक्षारोपणाची गरज आहे.

वृक्षारोपणाने पर्यावरणाचे प्रश्‍न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.पै.नाना डोंगरे म्हणाले की,वृक्षरोपण ही फक्त शासनाची जबाबदारी नसून,समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे.वाढते प्रदूषण रोखण्यासाठी,जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन वृक्षरोपणाने सुरक्षित करता येणार आहे.औद्योगिकरणामुळे एकीकडे विकास होत आहे.तर दुसरीकडे पर्यावरणा चा ऱ्हास होत चालला आहे.पर्यावरण रक्षण म्हणजेच सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले.